Apurva Phulari

27 October
Send Message

ते ना मला उमजले ना तुला समजले

तेव्हा होता वारा सुटलेला
आणि धरती तृप्त झालेली
गगनात खळबळ उडालेली
ते ना मला उमजले ना तुला समजले!

फक्त एकच डाव खेळायचा होता
आणि तोच जिंकायचा होता
पण तुझ्या विरूद्ध खेळायचा होता
मी जिंकूनही हारले आणि तू हारुनही जिंकला
ते ना मला उमजले ना तुला समजले!!

होते केलेले घरटे मनाच्या गाभाऱ्यात
आणि त्या पक्षाने तर घरटेच बदलले
पण अजुनही ते घरटे वाट पहात आहे
कधी तो पक्षी येईल आणि क्षणात तृप्त करेल
ते ना मला उमजले ना तुला समजले!!!

अजूनही त्या हरवलेल्या वाटेवरती जाऊन
दडलेल्या मनाच्या गाठीला फुकर घालावी
आणि त्या वाटेवर पडणाऱ्या गुलमोहराच्या
सुगंधाने मन ओलेचिंब करावे
ते ना मला उमजले ना तुला समजले!!!!

सागराच्या कुशीत न बसणाऱ्या यातना
काय मोठा गुन्हा केला की माझी न मी राहिले
दगडालाही पाझर फुटेल असा आतला आवाज
शेवटी आतच राहिला.. आतच राहिला.....
ते ना मला उमजले ना तुला समजले!!!!!

Apurva Phulari
560 Total read