Suresh Bhat

Ghazal Samrat] (15 April 1932 – 14 March 2003 / Amravati, Maharashtra / India

बोलणी - Poem by

आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
'ही कृपा ईश्वरी'- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
'छान धन्वंतरी बोलती !'

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

(एल्गार)
105 Total read