Chintamani Try Khanolkar

Arati Prabhu] (8 March 1930 – 26 April 1976 / Baglanchi Rai, Vengurla, Maharashtra / India

गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे - Poem by Chintamani Tryambak Khanolkar

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा
743 Total read